केंद्रीय मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – राज्यातील रस्ते बांधणासाठी वेग येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा करताना तब्बल 2780 कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होण्यास आता मदत होणार आहे. यात कोकण ते विदर्भातील कामांचा समावेश आहे. गडकरी यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. गडकरी यांनी कोणते रस्ते करण्यात येणार आहेत, याचे अनेक ट्विट केले आहेत.

यामध्ये कोकण विकासाला चालना देण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here