पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – व्हिडीओ गेमच्या पैशाच्या वादातून दोघांनी तरूणाच्या मानेवर कोयत्याने वार केला. ही घटना मंगळवारी येरवडा येथील साळवेनगरमधील भाजी मार्केटजवळ घडली.
याप्रकरणी अथर्व विशाल वाघ (१९) आणि फिरोज नसीर खान (१९, रा. दोघेही रा. सिध्दार्थनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराग अलोक पवार (१९, रा. साळवेनगर, यरेवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






