तलवारी हातात घेऊन तरूणाचा पाठलाग करणाऱ्या तिघांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जुन्या वादातून तरुणाला तलवारी हातात घेऊन पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना येरवडा येथील मित्तल चौकाजवळ घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ओमकार उर्फ डब्या मनोज जगधने ( १९,रा. येरवडा ), मयुर संजय माचेकर (२३, रा. वडगांवशेरी), पांग्या उर्फ हर्ष गायकवाड (१९, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विकास उर्फ कान्या याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन उर्फ रॉबर्ट दिपक ससाणे (१७, रा. मित्तल चौकाजवळ, येरवडा) याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून तिन्हीही आरोपी २८ मार्चच्या रात्री हातात कोयता आणि तलवारी घेऊन रोहन राहत असलेल्या गल्लीत आरडा ओरडा करत शिरले. त्याला मारण्याकरिता आरोपी रोहनच्या मागे धावले. त्यानंतर त्यांच्या घरात घुसुन त्याच्या बहिणीला रोहनचे हात पाय तोडू अशी धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here