धुळे (प्रतिनिधी) – शहराजवळ वरखेडे हे गाव आहे.या गावातुन बांधकाम कामगार व स्टाईल फिंटींग करणारे मजूर दुचाकी ने दररोज धुळे शहरात येत असतात दरवर्षी या गावातील चार ते पाच कुशल कारागीर रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात हे आम्हाला तेथील समाधान भाऊ यांनी सांगितले की, हेल्मेट मुळे माझे अनेकदा प्राण वाचले परंतु सर्वच हेल्मेट खरेदी करु शकत नाहीत.आम्ही सर्व गावातील नागरिकांना रस्ता सुरक्षा फाऊंडेशन मार्फत हेल्मेट वाटप करण्याचे आश्वासन देऊन आज प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात केली.यासाठी समाधान भाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संस्थेंमार्फत अध्यक्ष महेश नेरकर व राजेश गायकवाड, आनंद सोनवणे यांनी काम पाहिले.










