चिंताजनक! १०-२० वर्षे वयोगटात कोरोनाचा धोका वाढतोय,पालकांनो काळजी घ्या!

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यात आता महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. १० ते २० वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.

मार्चमध्ये १० ते २० वर्ष वयोगटातील तब्बल ५५ हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे. नवीन स्ट्रेन बाधित करण्याची क्षमता अधिक असल्याचे तात्याराव लहाने म्हणाले. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने त्यांनी चिंता देखील व्यक्त केली.

२० वर्ष ते ४० वर्षे या वयोगटातील रुग्णसंख्या सध्या जास्त असून १० वर्षांच्या वरील मुलांना कोरोनाचा धोका जास्त असल्याचेही ते बोलले. त्याचबरोबर ५ वर्ष ते १० वर्ष या वयोगटातील मुलांना संक्रमण झपाट्याने होत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या स्ट्रेनमुळे एकामुळे १० पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधीच्‍या स्ट्रेन मुळे केवळ ४ ते ५ जण व्हायचे. पालकांनी घाबरून न जाता काळजी घेणे आणि सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here