नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. दरम्यान, उद्योजक आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत याची माहिती दिली. तसंच आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आपले पुढील दौरे रद्द केले आहेत.
“नुकतंच मला कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यानं आसाम दौरा रद्द करावा लागत आहे. माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या असुविधेसाठी मी क्षमा मागते. मी काँग्रेसच्या विजयाची प्रार्थना करते,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
हाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है। मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी। इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ। मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
सध्या काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहे. प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभांना संबोधित करणार होत्या. दुपारी गोलपारा पूर्व. त्यानंतर गोलकगंज आणि त्यानंतर सरुखेत्री या ठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं.






