दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे.

अटकेत असलेले निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. सोबतच आयएफएस दर्जा असणारे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांना सहआरोपी करून त्यांनाही अटक आणि बडतर्फ करण्यात यावं असा सूर त्यांनी आळवला आहे.

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन नामवंत विशेष सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here