‘लोकल’बद्दल निर्णय होण्याची शक्यता

mumbai-local

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – मुंबईतील करोना परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. गेलय काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, गुरुवारी रुग्णसंख्येचा विस्फोट झाला.

मुंबई एकाच दिवसात ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अचानक रुग्णसंख्येनं उसळी घेतल्यानं प्रशासन सतर्क झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे निर्बंध लावण्याचे तसेच लोकलबद्दल मोठा निर्णय होण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईत गुरुवारी ८ हजार ६४६ नवीन रुग्ण आढळून आले व १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५५ हजार ५ रुग्ण उपचार घेत आहेत. अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं प्रशासनानं निर्बंध कडक करण्याचा विचार सुरू केला आहे. तसे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here