तीन लिंगांसहीत जन्माला आलं बाळ, डॉक्टरही झाले हैराण

मोसूल (इराक) – येथून जवळच असलेल्या एका गावात एक बाळ तीन लिंगासहीत जन्माला आल्याने खळबळ उडाली आहे. त्या बाळाला एक लिंग शरीराच्या आत आहे तर दोन लिंग ही शरीराच्या आतल्या बाजूला आहेत. या मुलावर शस्त्रक्रीया करून डॉक्टरांनी त्याची अधिकची दोन लिंग काढून टाकली आहेत.

सिरपीस गावात राहणाऱ्या एका दाम्पत्याला महिनाभरापूर्वीच मुलगा झाला. मुलाच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक मुलाच्या गुप्तांगाजवळचा भाग सुजल्यासारखा दिसू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. सुरुवातीला डॉक्टरांना हर्नियाचा त्रास आहे असे वाटले. मात्र त्या मुलाचा सीटीस्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. मुलाला तीन लिंग असल्याचे त्यात दिसून आले. मुख्य लिंगाच्या बाजूला एक लिंग होते व खालच्या भागात एक लिंग होते. ही दोन्ही लिंग शरीराच्या आत असल्यामुळे जन्माच्या वेळेस डॉक्टरांना याबाबत समजले नाही.

त्यानंतर डॉक्टरांनी त्या बाळावर शस्त्रक्रीया करून त्याची शरीराच्या आतील दोन लिंग काढून टाकली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाला एक दुर्मिळ आजार असून त्याला डिप्लेहिया असे नाव आहे. तसेच या आजाराला ट्रिपहेलिया देखील म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here