शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) – शिर्डी येथील कोवीड सेटरचा रविवारी खा.सदाशिव लोखंडे यांनी आढावा घेत संबधित सर्व प्रांतधिकारी, तहसीलदार, डॉक्टर, यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समाजावून घेतल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोठेही कोविड प्रतिबंधक लस कमी पडू देणार नाही तसेच रेमडीसिव्हर इंजेक्शनचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश औषध प्रशासनास दिले. यावेळी अडचणी मांडतांना शिर्डी येथील कोवीड सेटर मधील कायम व कंत्राटी कर्मचारी यांनी तक्रार केली की आम्हाला मोफत लस दिली जात नाही, तसेच कर्मचारी निवास व्यवस्था भक्त निवास येथे करावी अशी मागणी केली
यावर त्यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना सर्व कर्मचाऱ्यांना मोफत लस देण्याचे सागितले तसेच कोवीड सेटरमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याची व्यवस्था श्री साईबाबा संस्थानचे व्दारावती धर्मशाळेत करण्यात यावी साईभक्त नसल्यामुळे सर्व धर्मशाळा मोकळ्या आहेत तसेच शिर्डी येथील कोवीड सेटर मधील सर्व रूम,जेवण, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी ,सर्व सुविधा या श्री साईबाबा संस्थानच्या असल्यामुळे त्या ठिकाणी असलेले सर्व खाजगी जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश तहसीलदार हिरे यांना दिले. याप्रसंगी कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, सतिष तुरकणे,साई तनपुरे, डॉ. प्रितम वडगांवे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थिती होते.






