भाजयुमो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना महाराष्ट्रातून ‘जय श्रीराम’ लिहून १० लाख पत्र पाठविणार

नाशिक (तन्मय गांगुर्डे) – माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी नुकतेच एक विधान केले की श्री रामाचं मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, वास्तव्यास बगल देऊन समाजाची दिशा भूल करायची आणि राजकारण करायचं ही पवार साहेबांची फार जुनी सवय परंतु हे करत असताना त्यांनी प्रभू श्री रामाचा देखील वापर केला हे दुर्भाग्य. त्यांना ज्या गोष्टींची भूल पडली आहे त्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी निषेध आंदोलन स्वरूपात भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून 10 लाख पत्र “जय श्री राम” लिहून त्यांना पाठविण्याचे ठरविले असून त्याची सुरुवात आज (दि.२२) नाशिक येथे सुध्दा करण्यात आली.कल्याण येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या दोन दिवसात हजारो पत्र पाठविण्याचा संकल्प केला आहे.
सदर आंदोलनात नाशिक मधून भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे योगेश मेंद,नाशिक शहर अध्यक्ष अजिंक्य साने, अमित घुगे ,अमोल पाटील, वैभव महाले, तन्मय गांगुली,योगेश मोरे,भूषण पगार, देवेंद्र निकम सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here