महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

भुसावळ (गिरीश पवार) – आज (दि.२२) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वराडसिम आरोग्य केंद्र येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला व कोरोना योद्धा भगिनींच्या हस्ते केक कापुन त्यांच्या सोबत वाढदिवस केला साजरा..
अजित दादांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो. मात्र यंदा राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
त्या पार्श्वभूमीवरच उपाय म्हणून अजित दादांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी तसे आवाहन केले होते.
सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. ही महामारी कमी व्हावी म्हणून महाराष्ट्रमध्ये सरकार तत्परतेने काम करत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ व सन्मान पत्र व साडिचोळी साठी भगिनींना रोख रक्कम देउुन सन्मानित करण्यात आले व ऋण व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या…
त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील,गटविकास अधिकारी विलास भाटकर साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संगिता दवंगे,डॉ शीतल कदम,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाअध्यक्ष सागर दोळे ,युवक जिल्हा चिटणीस मंगेश पाटील,माजी सरपंच विलास पाटील,योगेश नरोटे ,देवेंद्र पाटील आदी मंडळी उपस्थित होती…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादि युवक कॉंग्रेस च्या वतीने जिल्हयाभरात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार अशी माहिती रविंद्र नाना पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जळगाव, जिल्हा परिषद सदस्य,जळगाव, जिल्हा नियोजन समिती सदस्य,जळगाव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here