बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या राज्य महिला संपर्क प्रमुख म्हणून सोनिया जॉर्ज डिसुजा यांची निवड

पुणे (बाजीराव नाईक) – आज (दि.२२) बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्षा सौ तेजस्वी गणेश कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोनिया जार्ज डिसोजा महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुखपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
सोनिया जार्ज डिसोजा (रा आँस्टीन नगर,चाळ नं २,रूम नं १, अडवली,ढोकली कल्याण पुर्व, जि ठाणे,मुबंई.) या समाजसेवक असून, लेखक, कवयित्रीसुध्दा आहेत. आजवर त्यांनी केलेले विविधांगी विषयावरील लिखाण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून प्रकाशित झाले आहे. समाजसेवेत कार्यरत असताना त्यांनी विविध पक्ष, संघटनामध्ये अनेक पद भूषविले आहे. कोरोना संकटकाळी त्यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला आणि कित्येक लोकांना अन्न धान्य वाटप केले. सोनिया डिसोजा यांनी कवितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आवडत्या कवयित्री म्हणून ओळख आहे.
समाजाप्रती असणारी आस्था पाहून बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांनी सोनिया जॉर्ज डिसुजा यांची बिनविरोध निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि.संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here