उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण हे गेल्या १२ वर्षांपासून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित करीत असतात.
या ही वर्षी ना.अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी हॅण्डबुकची बारावी आवृत्ती ग्रामविकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे प्रकाशित करण्यात आली. यावेळी आ.भरत भालके, विजूभाऊ चौधरी, राजेश पाटील, राजेश वानखेडे, संजय चव्हाण, डॉ.दीपक पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here