भाजप नेत्याचा धक्कादायक दावा : मास्क घालू नका; कोरोना गेला

गुवाहाटी (आसाम) – मास्क घालू नका कोरोना गेला आहे असा दावा भाजप नेते हेमंत बिस्व सरमा यांनी केल आहे. तसेच आसामच्या नागरिकांना आता मास्क लावण्याची गरज नाही असेही बिस्व म्हटले आहे.

आरोग्यमंत्री असलेले हेमंत बिस्व एका मुलाखातीत म्हणाले की, आसाममधून कोरोना नष्ट झाला आहे. आता आसामच्या नागरिकांना मास्क लावण्याची गरज नाही. केंद्र सरकार याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करू शकतात. पण आज आसाममध्ये कोरोना नाही. राज्यात कोरोना परतला तर मी नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करेन असेही बिस्व म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here