अक्षय कुमार पाठोपाठ अभिनेता गोविंदाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड कलाकार एकापाठोपाठ कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. रविवारी सकाळी अभिनेता अक्षय कुमार याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गोविंदा सध्या घरात विलगीकरणात राहात असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सकाळीच माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला मला सौम्य लक्षणे जाणवत आहेत. घरातील इतर सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पत्नी सुनिता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेता गोविंदा याने दिली आहे. तसेच मी सध्या होम क्वारंटाईन असून माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवासांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी, अशी विनंतीही गोविंदाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here