कोरोना टेस्टिंग करणाऱ्या लॅबवर ताण

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – गेल्या २-३ महिन्यात झालेला हलगर्जीपणा कारणीभूत होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली आणि आता तर कोरोना बाधितांच्या रुग्णांनी कळस गाठला आहे.

कोरोना हॉटस्पॉटमध्ये जगात महाराष्ट्र नंबर ४ वर आहे. गेल्या २ महिन्यात कोरोना संपला आहे अशीच काहीशी लोकांची समजूत झाली आणि लोक बिनधास्त बाहेर फिरू लागले, या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गर्दी वाढू लागली, बाजार, मॉल, लग्न समारंभ इथेही लोक गर्दी करू लागले आणि नेमकी इथेच कोरोनाने प्रादुर्भाव वाढीची संधी साधली.

कोरोना जोमाने वाढला. अचानक एकेक दिवशी हजारोच्या संख्येने वाढ होऊ लागली. याच्या परिणामी कोरोना चाचणी करण्याचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्व लॅबवर ताण येत आहे. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here