लाचखोर पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शासनाने रेशन दुकानातील खातेदारांचे रेशनकार्ड आधारकार्डाशी जोडणे बंधनकारक केले असल्याने, या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी नवापूर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदारांच्या मामाचे रेशन दुकान असून, ते त्यांना शासकीय कामात मदत करत असतात. शासनाने रेशन दुकानातील खातेदारांचे रेशनकार्ड आधारकार्डाशी जोडणे बंधनकारक केले असल्याने, त्यांनी नवापूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रविंद्र निंबा कानडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एका रेशन दुकानाचे १००० रुपये याप्रमाणे २००० रुपये तसेच ४ महिन्याचे एकूण ८००० रुपये लाचेची मागणी २८ जानेवारीला केली.

तक्रारदारानी या प्रकरणी तक्रार दिल्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदूरबार यांनी कारवाई करून सापळा लावून पुरवठा निरीक्षक रविंद्र निंबा कानडे यांना ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई सापळा सहअधिकारी जयपाल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली एचसी उत्तम महाजन, संजय गुमाणे, पीएन दीपक चित्ते, मनोज अहिरे, संदीप नावडेकर, अमोल मराठे, वाहनचालक मनोहर बोरसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here