३० एप्रिलपर्यंत कोल्हापूरचे महालक्ष्मी, जोतिबा मंदिर भाविकांसाठी बंद

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – देशभरात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरु असल्यामुळे कोल्हापूरचे महालक्ष्मी, जोतिबा मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जोतिबाची चैत्र यात्रा आणि महालक्ष्मीचा रथोत्सवदेखील रद्द करण्यात आला आहे.

मंदिरात केवळ नित्य पूजाअर्चा सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीने सांगितले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिराच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे, असे देवस्थान समितीने कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here