सातारा (शरद मोरे) – कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बाधितांच्या आकड्यासह बळींचाही आलेख वाढतच आहे. विस्फोट होत आहे. सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असताना मंगळवारी आणखी दोघांचा बळी गेला आहे. चार दिवसांत तब्बल 13 जणांचे बळी गेले असून बळींची संख्या 87 झाली आहे. तर 91 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा 2640 झाला आहे. दरम्यान, मंगळवारी 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचीही दीड हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांच्या आकड्याचा दररोज स्फोट होत आहे. त्यातच दिवसेंदिवस बळींची संख्या वाढू लागल्याने जिल्हावासीयांना धडकी भरली आहे. मंगळवारी सातारा शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेल्या साबळेवाडी (ता. सातारा) येथील 54 वर्षीय पुरुष व खातगुण (ता. खटाव) येथील 85 वर्षीय वृद्धेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये सिद्धनाथवाडी 2, भुईंज 1, शेंदूरजणे 8, बोपेगाव 1 असे 12 बाधित आले आहेत. खंडाळा तालुक्यातील नायगाव 1, शिरवळ 2 असे तीन बाधित आढळले.
सातारा तालुक्यातील खावली 1, खिंडवाडी 2, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 2, नागठाणे, गणेशवाडी 1 असे 7 पॉझिटिव्ह आढळले. खटाव तालुक्यातील वडूज 2, डिस्कळ 3, वडूज 1, नेर 2 अशा 8 जणांना लागण झाली. माण तालुक्यातील दहिवडी 1, कोरेगाव तालुक्यातील बनवडी 1, वाठार किरोली 1, फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 4, सासवड 1, वारेवस्ती, खामगाव 10, साखरवाडी लक्ष्मीवाडी 2 असे 17 पॉझिटिव्ह आढळले. पाटण तालुक्यातील नेरले 5, महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली 8, भिलार 1 असे 9 बाधित आढळले. कराड तालुक्यातील उंब्रज 5, वराडे 4, कालगाव 1, आगाशिवनगर 2, कोळे 2, शामगाव 1, बेलवडे, बुद्रुक 1, कासारशिरंबे 1, कराड शहर 6, मलकापूर 2, कालवडे 2 असे 27 बाधित आढळले.
जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल व कोरोना कोविड सेंटरमधून मंगळवारी 69 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 हजार 439 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 87 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 1 हजार 152 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहेत.







