जळगाव शहरात आढळले सर्वाधिक १२१ कोरोना बाधित; जिल्ह्यात ४१८ कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२२) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात आज जिल्ह्यात नव्याने ४१८ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या ८६०५ झाली आहे. सर्वाधिक १२१ कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले. दिवसभरात १२ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात कोरोनाचा कहर सुरुच आहेत. यात जिल्ह्यात बुधवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर १२१, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ २९, अमळनेर १५, चोपडा ४५, पाचोरा १८, भडगाव २, धरणगाव २५, यावल १६, एरंडोल १०, जामनेर ३८, रावेर ३३, पारोळा ५, चाळीसगाव ४४, मुक्ताईनगर २, बोदवड ३ अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात १२ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील ३, अमळनेर तालुक्यात २, जळगाव तालुका, यावल, रावेर, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here