उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर व मास्क वाटप

शहादा (विजय पाटील) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर, युवक शहराध्यक्ष जगदीश माळी, शुभम कुंवर, रवि ठाकरे, विवेक पाटील, नवनीत पवार, आकाश पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगात कोरोनाचे संकट असल्यामुळे अजितदादांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे म्हणून येथील राष्ट्रवादी पक्षाकडून कोरोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून अजितदादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here