नेर परसोपंत येथे पॉवर ऑफ मिडियाची स्थापना

तालुकाध्यक्ष अध्यक्षपदी नवनाथ दरोई तर उपाध्यक्षपदी अजमतउल्ला खान

नेर (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथे पॉवर ऑफ मिडियाची स्थापना करण्यात आली असून एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी नवनाथ दरोई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अजमतउल्ला खान (लोकमत समाचार) यांची निवड झाली. सचिवपदी मनोज झोपाटे यांची निवड करण्यात आली ही बैठक पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर व राज्य संघटक संदीप बाजड यांच्या आदेशावरून घेण्यात आली.
या बैठकीला पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागाचे संघटक वकील दानिश,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत झोपाटे नांदगांव खंडेश्वर येथील तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या बैठकीला तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार उदय कानतोडे, किशोर वंजारी, वसीम मिर्झा, रिजवान पटेल, शहीद खान, बिस्मिल्ला खान, इत्यादी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसीम मिर्झा यांनी केले. अजमतउल्ला खान यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here