जयपूर (राजस्थान) – येथील तुरुंगात पोलिसांच्या डोळ्यात मसाला टाकून १६ कैद्यांनी पळ काढला आहे. पोलिसआंनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश गुन्हेगार हे खून आणि अंमली पदार्थांचे तस्करी केल्याप्रकरणी शिक्षा भोगत होते.
राजस्थानच्या जयपूरमध्ये तुरुंगात रात्री साडे आठच्या सुमारास कैदी जेवत होते. तेव्हा काही कैद्यांनी पोलिसांच्या डोळ्यात तिखट मसाला फेकला आणि तुरुंगातून पळ काढला.
या प्रकरणी पोलिसांनी विविध भागात त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






