मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या टेलरबॉम्बवर प्रतिक्रिया देताना, सत्य बाहेर यायला पाहिजे असे म्हटले आहे. मूळातच हे पत्र अतिशय गंभीर आहे. या पत्रातील मजकूर हा सर्वांना विचार करायला लावणारा आहे. एकूणच महाराष्ट्रात जे घडतंय ते महाराष्ट्राच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलं.
उच्च न्यायलयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. आता, ही चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. या सर्वच प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहिजे, सत्य जर बाहेर आलं नाही तर ही डागाळलेली प्रतिमा कधीच नीट होणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय. सचिन वाझेने मीडियाला 3 पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी 2 कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. तसेच, अनिल परब यांचेही नाव घेतले आहे. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सरकारने रेमडेसिव्हीरच्या संबंधात विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. मागच्यावेली जसा रेमडेसेव्हीरचा काळाबाजार होत होता. तसाच, काळाबाजार आताही होताना दिसत आहे. कोरोनाची आताची लाट ही देशातील काही राज्यांमध्ये आहे, सर्वच राज्यांमध्ये नाही. त्यामुळे, आपल्या राज्याने ज्या राज्यात लाट नाही, तेथून रेमडेसिव्हीर घेता येईल का, हे पाहिलं पाहिजे. तसेच, रेमडेसिव्हीर उत्पादित कंपन्यांशी संपर्क साधून अधिक इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत चर्चा करावी. तसेच, रेमेडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने करावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.






