केंद्राचा महाराष्ट्राबाबत ‘दुजाभाव’; इतर राज्याच्या तुलनेत 6 पट कमी ‘डोस’

rajesh-tope

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – केंद्र सरकारने उत्तरप्रदेशला 48 लाख लसीचे डोस दिले असून महाराष्ट्राला केवळ 7.5 लाख लसीचे डोस दिले आहेत. देशात सर्वात जास्त करोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात असूनही इतर राज्याच्या तुलनेत कमी डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकार राज्याबाबत दुजाभाव करत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

‘ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशला 48 लाख, मध्यप्रदेश 40 लाख, गुजरात 30 लाख, हरियाणा 24 लाख तर महाराष्ट्राला केवळ 7.5 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. परंतु गुजरातला आतापर्यंत एक कोटी लस मिळाल्या आहेत. तर त्या तुलने महाराष्ट्राला खुप कमी डोस मिलाले आहेत. महाराष्ट्राला दर आठवड्याला किमान 40 लाख डोसची आवश्यकता आहे. केंद्राने इतर देशांना लसीचा पुरवठा करण्यापेक्षा आपल्या राज्यांना मागणीनुसरा लस पुरवावी असेही टोपे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here