चोपडा (संदीप ओली) – आमदार लताताई सोनवणे यांनी कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढत्या संख्या बाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी मा.डाॅ.अभिजित राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडून सि.एस.आर. फंड उपलब्ध झाल्याने आज चोपडा उपजिल्हा रूग्णालयास ५० बेड आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातुन प्राप्त झाले.यावेळी तहसिलदार अनिल गावित शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील,तालुका प्रमुख राजेंद्र पाटील,पंचायत समितीचे मा.उपसभापती एम.व्ही.पाटील,पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, मा.पंचायत समिती सदस्य रमेश पाटील,तालुका संघटक सुकलाल कोळी,युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी,उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षक डाॅ.मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर व डाॅ.शरद पाटील उपस्थित होते.







