सैनिक”या विषयावर राज्यस्तरीय काव्य (कविता) स्पर्धेचे आयोजन
अलिबाग-सोगावकर – नियमित सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहून कार्य करणारे रायगडचा युवक मासिकाचे संपादक रायगड भूषण श्री जयपाल पाटील यांच्या संकल्पनेतून नेहमी नवीन नवीन उपक्रम राबवले जात असतात. यावेळी त्यांनी या मासिकातर्फे ‘सैनिक’ या विषयावर राज्यस्तरीय काव्य (कविता) स्पर्धेचे आयोजन केले आहे.
देशसेवेत आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या भूदल,नौदल,वायुदल यातील अनेक सैनिकांच्या सन्मानार्थ, तसेच तरुणांनी या देशसेवेच्या क्षेत्राकडे आकर्षित व्हावं,त्यांना यातून प्रेरणा मिळावी हा स्पर्धा भरवण्यामागे एक मुख्य उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चालू वर्षी मराठी भाषा दिनी मासिकात रुपांतरीत झालेल्या रायगड चा युवकाचा हा उपक्रम नवोदित कवींना एक चांगली संधी देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे कार्य नक्कीच कवीनकडून घडू शकेल. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ठेवण्यात आली असून प्रवेश फी – मनीऑर्डर व कविता (पत्र- पॉकेट) डाक विभागामार्फतच पाठवण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.
१) खुला गट (आधार -ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे) – प्रवेश फी- रु.१०० प्रथम क्रमांक- रु ३०००/ द्वितीय क्रमांक – रु २०००/- तृतीय क्रमांक – रु १०००/-. २) कॉलेज गट( ११ वी ते १५ वी)( कॉलेजचे ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे) – प्रवेश फी- रु.७५/- प्रथम क्रमांक- रु १५००/- द्वितीय क्रमांक – रु १०००/- तृतीय क्रमांक – रु ५००/- ३) शालेय गट( ५ वी ते १० वी) ( शाळेचे ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे) – प्रवेश फी- रु.५०/- प्रथम क्रमांक- रु ६००/- द्वितीय क्रमांक – रु ४००/- तृतीय क्रमांक – रु २००/- सर्व विजेत्यांना सोबत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कविता ही स्वरचित असावी. ती स्वतःची असल्याची (स्वयंघोषित) सेल्फअटेस्टेड प्रमाणित करावे. ती जास्तीत जास्त १४ ओळीची असावी. कविता कागदाच्या एकाच बाजूला चांगल्या हस्ताक्षरात किवां टंकलिखित असावी. ती पोस्टाने मिलिंद अनंत पाटील – कार्यकारी संपादक रायगडचा युवक, मु.पो. सारळ, ता. – अलिबाग, जि.- रायगड ४०२२०९. या पत्यावर अंतिम तारखेच्या आत पोहचेल अशी पाठवावी.
अंतिम तारीख ३० जून २०२१ ही राहील. हि स्पर्धा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर होत असल्याने सरकारी नियमाचे पालन करून सर्व प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच स्पर्धा सहभागावर बक्षीस, अंतिम तारीख व निकालाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार रायगडचा युवक-मासिक संपादक श्री जयपाल पाटील यांच्या अखत्यारीत असेल याची सर्व स्पर्धकांनी माहिती घेऊन या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा,असे आवाहन मासिकातर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रतिसादानंतर सैनिकांवर काव्यसंग्रह करून तो सैनिकांना अर्पण करण्याचा मानस असल्याची भावना श्री जयपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी मिलिंद अनंत पाटील- सारळ, (अलिबाग-रायगड) ९४०४७९१७९८. यांच्या कडे संपर्क साधावा.






