मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – प्रदीप शर्मा याना बहुचर्चित रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक करण्यात आली होती. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माजी पोलीस अधिकारी यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली
अंबानी याना धमकी आणि मनसुख हिरेन हत्येत त्यांचा सहभाग असावा असा संशय एनआयएला आहे. शर्मा याना रामनारायण गुप्ता हत्येप्रकरणी अटक झाली होती. ते ३ वर्षे कारागृहात होते. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक झालेला पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून प्रदीप शर्मा वगळता अन्य सर्वांना (शिंदेसहित) न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.
बुधवारी जवळपास आठ तास चौकशी झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर पडले.






