पुण्यात २६७८ नवे रुग्ण ४८ जणांचा मृत्यू

पुणे (पंढरी गायकवाड) – पुण्यात आज दिवसभरात एकूण 2678 रुग्ण आढळले. त्यापैकी पुणे शहरातील 1751, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 927 नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्याप्रमाणेच पुणे शहरात 33 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 15, असे एकूण 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पुणे शहरात बुधवारी ‘आरटीपीसीआर’ व ‘अँटिजेन’ चाचणीसाठी 7,595 संशयितांचे नमुने घेण्यात आले. याआधी घेतलेल्या नमुन्यांपैकी 1751 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42 हजार 466 झाली आहे. बुधवारी दिवसभरात 883, तर आतापर्यंत 25,129 कोरोनातून बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 16,269 अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 609 रुग्ण गंभीर असून, 94 अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
उपचारादरम्यान बुधवारी पुणे शहरात 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यापैकी 26 पुरुष तर 7 महिला आहेत. या मृतांचे वय 41 ते 92 च्या दरम्यान होते. हे रुग्ण मार्केट यार्ड, येरवडा, फुरसुंगी, मंगळवार पेठ, धानोरी, शनिवार वाडा, हडपसर, शुक्रवार पेठ, मुंढवा, बुधवार पेठ , विश्रांतवाडी, धनकवडी, भारती विद्यापीठ, बावधन, सिंहगड रोड, लोहगाव, शिवाजीनगर, कर्वे रोड, सुखसागरनगर, कोंढवा खुर्द, शिवणे, घोरपडे पेठ येथील रहिवासी होते. त्यापैकी काहींना जोखमीचे आजार होते. आता शहरातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 68 वर पोचली.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 927 नवे रुग्ण आढळले असून, पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 13,993 झाली आहे. आज 4,427 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या 203 जणांना तर आतापर्यंत एकूण 8 हजार 651 कोरोनामुक्‍त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
बुधवारी दिवसभरात काळेवाडीतील महिला (60), नेहरूनगरातील महिला (75) व पुरुष (60), आकुर्डीतील 2 पुरुष (62 व 63), थेरगावातील पुरुष (56), वाल्हेकरवाडीतील महिला (50), पिंपळे गुरवमधील पुरुष (75), पुनावळेतील पुरुष (38), मोरवाडीतील पुरुष (67), रहाटणीतील 2 पुरुष (58 व 43), जुन्नरमधील महिला (80), चाकणमधील पुरुष (49), स्वारगेटमधील महिला (56) या 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 301 जणांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here