राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना जळगाव भाजयुमोतर्फे दोन हजार पत्र

जळगाव (निलेश पाटील) – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही, असे वक्तव्य केले होत्. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना जय श्रीराम लिहिलेले पत्र पाठविण्याचा निर्णय भारतीय युवामोर्चाने घेतला आहे.
या निर्णयानुसार शरद पवार यांच्या ४५, सिल्व्हर ओक, भुलाबाई देसाई रोड, ४०००२६ या राहत्या घरी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने जय श्रीराम लिहिलेले दोन हजार पत्र पाठविण्यात आले. तसेच पुढील दोन दिवसात भाजपा युवा मोर्चा मंडलामार्फत २० हजार पत्रक जळगाव शहरातून पाठविण्यात येतील. हे पत्र पाठविताना, जिल्हा महानगर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलींद चौधरी, अक्षय जेजुरकर, उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, राहुल लोखंडे, राहुल मिस्त्री, विक्की सोनार, स्वामी पोतदार, चिटणीस प्रतीक शेठ, रोहित सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, पुष्पेंद्र जोशी, जयंत चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here