अमेरिकेने चीनला दिला दूतावास बंद करून ७२ तासांत चालते होण्याचा आदेश

वॉशिंग्टन – ह्युस्टन येथील चिनी दूतावासात मंगळवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जाळण्यात आली. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने त्यावर चीनविरुद्ध आणखी एक कडक कारवाई केली असून, शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत (स्थानिक वेळ) दूतावासाला टाळे ठोकून चालते व्हा, असा आदेश दूतावासातील अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देत वुहानमधील दूतावास बंद करा, असे सांगितले आहे.
दरम्यान, चिनी अधिकार्‍यांनी ह्युस्टन दूतावासातील कुठल्या प्रकारची कागदपत्रे दूतावासात जाळण्यात आली, ते नेमकेपणाने अद्याप स्पष्ट झालेले नाही. दूतावासाच्या जवळपास राहणार्‍या लोकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली होती.
अमेरिका आणि चीन संबंध आता टोकाच्या शत्रुत्वाच्या वळणावर आलेले आहेत. मंगळवारी रात्री ह्युस्टन चिनी दूतावासात हजारो कागदपत्रे जाळली गेली आहेत. घटनेनंतर काही क्षणातच अमेरिकेने गंभीरपणे दखल घेतली आणि 72 तासांत तुमचे चंबुगबाळे येथून आवरा, असे स्पष्टपणे चीनला कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here