सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्याप्रकरणी खासगी कंपनीला 87 हजारांचा दंड

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी येथील एका खासगी ऑफिसमध्ये तब्बल 87 कर्मचारी ‘सोशल डिस्टन्स’ न ठेवता कामावर असल्याने महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून या कंपनीकडून तब्बल 87 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पुन्हा नियमभंग झाल्याचे आढळल्यास कंपनी सील करण्याचा इशारा दिला आहे.

वाकडेवाडी येथील अत्यावश्‍यक सेवां अंतर्गत परवानगी दिलेल्या कार्यालयांची तपासणी करताना महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने कॅलिबर बिझनेस सपोर्ट सव्हिसेस प्रा.लि. या कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सदर कंपनीतील 87 कर्मचारी काम करत होते. या कार्यालयात ‘सोशल डिस्टन्स’ पाळत नसल्याचे आढळून आले नाही.

त्यानुसार या कंपनीला 87,000 रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल, अशी ताकीद देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here