

जळगाव (निलेश पाटील) – राज्यसभेच्य़ा नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळ्याप्रसंगी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावरून राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. याचा जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले .
या वेळी सोबत आंदोलनात अल्पसंख्याक आघाडी प्रदेशअध्यक्ष हाजी गफ्फार मलिक ,महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील,युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे,सचिव अँड कुणाल पवार,डॉ.रिजवान खाटीक,किरण वाघ ,किशोर सुर्यवंशी,कुणाल मोरे,कैसर काकर,अखिल पटेल,अमोल कोल्हे,गणेश निबांळकर,गौरव वाणी,अक्षय वंजारी,नितीन जाधव,कल्पेश पाटील,हर्षवर्धन खैरनार,अनिल पवार ,फिरोज शेख तसेच रहीम तडवी उपस्थित होते .







