धरणगांव शिवसेनेतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा निषेध

धरणगाव (योगेश पी पाटील) –  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खा.उदयनराजे भोसले यांनी काल संसदेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना अखेरीस जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय हे शब्द उच्चारल्यानंतर, उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ‘हे तुमचे घर नाही, हे माझे चेंबर आहे, येथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा‘, असे सांगितले. भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष यांनी वरील वक्तत्व केल्याबद्दल धरणगांव शिवसेनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला
धरणगांव तहसीलदार सो यांना निवेदन देतांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डी. जी.पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,ता प्रमुख गजानन पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, काँग्रेस तालुका सरचिटणीस चंदन पाटील,माजी प.स.उपसभापती प्रेमराज पाटील,अ‍ॅड.शरद माळी,नागरसेवक वासुदेव चौधरी, जितेंद्र धनगर,अहमद पठाण,सुरेश महाजन, रवींद्र जाधव,मनोज कंखरे, बाळू जाधव,धिरेंद्र पुरभे, मनोज कंखरे, लक्ष्मण महाजन, रामचंद्र महाजन, गोपाल पाटील, प्रकाश पाटील पापा वाघरे, विलास पवार,अरविंद चौधरी, बुट्या पाटील आदी पदाधिकारी,नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here