दत्ता हलसगीकर स्मृती समिती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदउपनगरीय शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – येथील कलानगरीत सातत्याने सांस्कृतिक जडणघडण होत असते. या सांस्कृतिक जडणघडणीला कोरोनामुळे उद्भवलेला लॉकडाऊन अपवाद ठरू शकत नाही. म्हणूनच, कविवर्य दत्ता हलसगीकर स्मृती समिती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा, सोलापूर यांनी ‘कविवर्य दत्ता हलसगीकर स्मृती राज्यस्तरीय ऑनलाईन साभिनय काव्यनाट्य स्पर्धा’ आयोजित केली आहे. ‘काव्य’ या साहित्य प्रकाराचे नाट्यमय सादरीकरण करणे असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.
स्पर्धेसाठी आवश्यक अटी व नियम – सदरची स्पर्धा ही दोन गटांसाठी असणार आहे. शालेय गट आणि खुला गट असे दोन गट असून, दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. शालेय गटासाठी वयोमर्यादा वयवर्षे 9 ते 15 असेल. स्पर्धेतील ‘काव्य’ मराठी भाषेतीलच असावे. सादरीकरणादरम्यान काव्य प्रत्यक्ष म्हटले पाहिजे. रेकॉर्डिंग किंवा ध्वनिमुद्रण केलेले काव्य ग्राह्य धरले जाणार नाही. सादरीकरणासाठी किमान दोन पात्रे आणि कमाल कितीही चालतील. स्पर्धा सादरीकरणासाठीचा वेळ हा दोन्ही गटांसाठी तीन ते सात मिनिटे असेल. स्पर्धा ऑनलाइन असल्याने आपल्या सादरीकरणाचा व्हिडिओ तयार करून व्हाट्सअपवर पाठवायचा आहे. हा व्हिडिओ वन टेक शॉट असावा. तो कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नसावा. इफेक्ट दिलेला किंवा एडिट केलेला अथवा अनेक अँगल्सने चित्रित केलेला व्हिडिओ बाद ठरवला जाईल. स्पर्धा ऑनलाइन असल्याने नेपथ्याचा जुजबी वापर चालू शकेल. ‘पार्श्वसंगीत’ सादरीकरणाच्या वेळेतच ध्वनिमुद्रित व्हावे. त्यासाठी एडिट करून पार्श्वसंगीत देऊ नये. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेची डिजिटल प्रत आणि कवीची संमती प्रवेशिकेसोबत देणे बंधनकारक राहील. व्हिडीओ मध्ये सादरीकरणापूर्वी स्पर्धक संघाचे नाव, स्थळ, मोबाईल क्रमांक, कवितेचे नाव, कवीचे नाव, दिग्दर्शकाचे नाव यांचा उल्लेख करणे अनिवार्य असेल, कवीची संमती मिळाली नसल्यास, सादरीकरणानंतर/निकालानंतर जर काही वाद निर्माण झाल्यास, त्यास स्पर्धक संघ स्वतः जबाबदार राहील. तद्नंतर स्पर्धेत तो संघ ग्राह्य धरला जाणार नाही. सादरीकरणाचा व्हिडिओ हा दृकश्राव्य साठी योग्य असावा. काव्यनाट्याचे सादरीकरण करताना दृश्यानुभव हा ‘नाट्यात्म अनुभूती’ देणारा असावा. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 30/07/2020 असेल. सादरीकरण व्हिडीओ सादर करण्याची अंतिम तारीख 09/08/2020 असेल. स्पर्धेचा निकाल दिनांक 15/08/2020 रोजी सोशल मीडियावर जाहीर केला जाईल. सर्व स्पर्धक संघाना डिजिटल सहभाग प्रमाणापत्र मिळेल. परीक्षकांचा निर्णय किंवा निकाल अंतिम राहील.
पारितोषिके – खुला गट सांघिक प्रथम पारितोषिक रुपये ₹ 5000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रुपये ₹ 3000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रुपये ₹ 2000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, वैयक्तिक पारितोषिके – खुला गट अभिनय पुरुष अभिनय प्रथम क्रमांक ₹ 251/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, स्त्री अभिनय प्रथम क्रमांक रुपये ₹ 251/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, खुला गट दिग्दर्शन दिग्दर्शन प्रथम ₹ 1000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, दिग्दर्शन द्वितीय ₹ 750/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, दिग्दर्शन तृतीय ₹ 500/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, पारितोषिके शालेय गट सांघिक – प्रथम पारितोषिक रुपये ₹ 1000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रुपये ₹ 500/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रुपये ₹ 300/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, वैयक्तिक पारितोषिके – शालेय गट अभिनय पुरुष अभिनय प्रथम क्रमांक ₹ 151/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, स्त्री अभिनय प्रथम क्रमांक रुपये ₹ 151/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, शालेय गट दिग्दर्शन – दिग्दर्शन प्रथम ₹ 500/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, दिग्दर्शन द्वितीय ₹ 300/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, दिग्दर्शन तृतीय ₹ 200/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, सादरीकरण व्हिडीओ व प्रवेशिका या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे. 7588 37 1933 – डॉ. मीरा शेंडगे, 9860 20 5130 – संदीप जाधव, असे आवाहन स्पर्धा प्रमुख मीरा शेंडगे व संदीप जाधव यांनी केले आहे.







