इनरव्हील क्लबचा सामाजिक उपक्रम
चोपडा (संदीप ओली) – येथील इनरव्हील क्लबच्यावतीने कोरोना संकट काळात उपाययोजना व दक्षता या हेतूने वेले येथील
अनाथाश्रमातील बालकांना व वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळींना सॅनिटायझर किट वाटप करण्यात आले .
या कोरोना संकटकाळात उपाययोजना म्हणून हँड वॉश, तसेच मास्क व इतर महत्वपूर्ण साहित्य असलेल्या किटचे वाटप इनरव्हील क्लबच्या प्रांत 303 च्या व्हाईस चेअरमन अश्विनी गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
क्लबच्या वतीने अध्यक्ष शैला सोमाणी,सचिव अंकिता जैन ,रोटेरियन पूनम गुजराथी,माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू ,सीसी किरण पालिवाल,सीमा पाटील आदींनी ह्या किट्स चे वाटप केले.याप्रसंगी अनाथाश्रम व वृद्धआश्रमातील सर्व बालके,वृद्धमंडळी तसेच कर्मचारीवृंद श्वेता नेवे,निलेश चौधरी,प्रवीण माळी व इतर सदस्य उपस्थित होते. उपस्थित सर्वांना कोरोनाच्या या महामारीत जागरुकतेविषयी माजी अध्यक्ष डॉ.कांचन टिल्लू यांनी मार्गदर्शन करून सविस्तर माहिती दिली. कोरोना पासून बचावासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे सांगत त्यांनी कोरोना रुग्णाला चांगली वागणूक देऊन माणुसकीचे दर्शन घडवावे,असेही आवाहन त्यांनी केले.







