पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथील गोखलेनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास किसन जाधव (वय २३, रा. गोखलेनगर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार नीलेश जाधव, अक्षय उर्फ पिट्टू धोत्रे, विशाल गाढवे आणि आदित्य खुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार हे ओळखीचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी रात्री विकास याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here