मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या गॉल ब्लॅडरवर उद्या सर्जरी होणार आहे.
त्याबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर आणखी एक सर्जरी करण्यात येणार आहे.






