अक्कलकोट येथील मुस्लिम युवक संघटनानी केले कब्रस्तानमध्ये साफसफाईचे काम.

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)- अक्कलकोट येथील मुस्लिम कब्रस्तान सद्या चकाचक आणि सुंदर झाले आहे, याचे कारण म्हणजे गेल्या 16 -17 दिवसापासून या कबरस्तान मध्ये मुस्लिम युवक स्वच्छता मोहीम राबवित आहेत, आणि कब्रस्तान स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहेत.

या कब्रस्तान ची स्वच्छता व साफसफाई करून अतिशय सुंदर असे हे ठिकाण मुस्लिम समाजातील युवकांनी बनवले आहेत.कब्रस्तान ची स्वच्छता करण्याचे हे काम अक्कलकोट येथील मुस्लिम युवक संघटना यांच्यातर्फे करण्यात आला स्वच्छतेचे काम पूर्ण झालेले या कामासाठी मुस्लिम समाजातील युवक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिले आहेत त्यांच्या सहकाऱ्यांमुळे कब्रस्तान स्वच्छ करण्याचे काम करता आले. असेही मुबारक कोरबु आणि रशीद खिस्तगे यांनी सांगितले.

akkalkot-kabrasthan-cleaning-work-in-progress

या कामासाठी कब्रस्तान च्या स्वच्छतेसाठी नगरसेवक सद्दाम शेरीकर, इरफान दावणा, मुबारक कोरबू, रशीद खीस्तके, तन्वीर सय्यद, सरफराज कमानघर ,मन्सूर सय्यद, तोशिप डांगे, आयान सुभेदार ,लाला मणियार, वाहिद चाबुकस्वार,अल्ताफ ताची, इरफान मणियार, सोनू सुभेदार, सोहेल फरास, मोहन चाऊस,नवाज शेख, इमाम सय्यद, सरफराज शेख, या सर्वांचे मोठे सहकार्य या लाभले आहे. सर्वजण स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. गेल्या 17 दिवसापासून हे काम चालू होत 7 एकर जमीनअसलेल्या या कब्रस्तान मध्ये हे काम अखंड करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here