यंदाची जयंती घरातूनच साजरा करा – पो नि राजेश शिरसाठ

सारंगखेडा पोलीस ठाण्यात यंदाच्या जयंती संबंधित बैठक संपन्न

शहादा (तालुका क्रईम रिपोर्टर सुशील गव्हाणे) – दरवर्षी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती परिसरात मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा केली जाते.परंतु गेल्या दोन वर्षांपासून आपला देश कोरोना सारख्या महामारीशी झुंज देत आहे .त्यामुळे गेल्या वर्षी जसे मिरवणूक न काढता जयंती साजरा केली होती तशीच ह्यावर्षी सुद्धा परिसरातील तमाम आंबेडकरी जनतेने घरातूनच जयंती उस्तव साजरा करावा असे आवाहन सारंगखेडा पोलीस ठाण्यात पो नि राजेश शिरसाठ यांनी केले आहे.

त्या संबंधी काही मार्गदर्शक सूचना देण्यासाठी पो नि राजेश शिरसाठ ह्यांच्या मार्गदर्शना खाली सायंकाळी ५:०० वाजता सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील भिम अनुयायी व गावागावातील जयंती उत्सव समितीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्याची एकंदरीत परिस्तिती पाहता ह्या वर्षी सुद्धा जयंती उत्सव अतिशय साध्या पद्धतीने व कुटुंबापूरता मर्यादित ठेऊन साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.तसेच परिसरातील तरुण वर्गाला ह्या वर्षी आंबेडकर जयंती नाचून साजरा करण्याऐवजी वाचून साजरा करण्याचे विशेष आवाहन करण्यात आले. सदर बैठकी प्रसंगी सामाजिक अंतराचे विशेष भान ठेवण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here