मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – कोरोना व्हायरसची भारतात दुसरी लाट आली असून कोविड-19 विरुद्धचा लढा अधिक तीव्र झाला आहे. भारताने आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिक कोरोना लसीचे डोसेस दिल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाकडून शनिवारी देण्यात आली आहे.
१० कोटी डोसेस केवळ ८५दिवसांत देऊन लसीकरणात भारत हा सर्वात वेगवान देश ठरला आहे. १६ जानेवारीपासून भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली.
लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरु करण्यात आला असून या अंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली. तर १एप्रिलपासून सुरु झालेल्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.






