शिर्डीत विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

  • विकेंड लॉकडाऊनमुळे शिर्डीतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

शिर्डी(शहर प्रतिनिध) – महाराष्ट्र शासनाने शनिवार, रविवार या दोन दिवशी जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. शिर्डीत या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घराबाहेर न जाता घरी राहणे पसंत केल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसुन आला. कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने राज्य शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सोमवार दि.५ एप्रिलपासुन मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

अत्यावश्यक सेवा, हॉटेलमध्ये पार्सल सुविधाची, बेकरी पदार्थ विक्रीस परवानगी देत अन्य सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे तसेच शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनचे आदेश दिले. त्यानुसार कडक निबंध लादत मिनी लॉकडाऊन सुरु झाला आहे. पहिल्या शनिवारी विकेंड लॉकडाऊनला शिर्डीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. सर्व दुकाने बंद असल्याने नागरीकांनीदेखील घराबाहेर पडणे टाळत विकेंड लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद दिला. विकेंड लॉकडाऊन पाळल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे सर्व शुकशुकाट जाणवत होता.

शिर्डी नगरपंचायत व पोलीस स्टेशन यांचे पथक कोठे दुकाने चालु आहे का, विनाकारण नागरिक फिरत आहे का याची शहरात देखरेख करत होते. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पो.नि.प्रविण लोखंडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी शहरात ठिकठिकाणी भेटी देत पाहणी केली. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले की, शिर्डी शहरात विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

नगरपंचायतच्या पथकाने शहरात जाऊन पाहणी केली. ज्या भागात अधिक रुग्ण आहेत. त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करुन संपर्कात आलेल्या नागरिकांची थर्मामीटर गणच्या सहाय्याने तपासणी केली जात आहे. पुर्वी तिस रुग्ण मिळुन येत होते. दोन दिवसापासुन रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसाला दहा रुग्ण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपंचायतचे पथक जनजागृती तसेच तपासणी मोहीम चांगल्या पद्धतीने राबवत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन डोईफोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here