संगीतकार ‘बप्पी लहिरी’ यांना रुग्णालयातून डिस्चार्जc

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – मुंबई – सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. बप्पी लहिरी यांना करोना संसर्गामुळे गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बप्पी लहिरी यांनी काळजी घेतल्याबद्दल डॉक्‍टर्स आणि ब्रीच कॅंडी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शुभेच्छा पाठवणाऱ्या सर्वांचे बप्पी दा यांनी आभार मानले.

गेल्या आठवड्यात बप्पी दा यांना ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांची मुलगी रीमा लहिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बप्पी दा यांनी करोनाबद्दल प्रचंड सतर्कता बाळगली होती. त्यांनी करोनाची लसही घेतली आहे. तरीही त्यांना करोनाची लागण झाली. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here