मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असं मत बैठकीत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021






