अमळनेर (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खा.उदयनराजे भोसले यांनी काल संसदेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतांना अखेरीस जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय हे शब्द उच्चारल्यानंतर, उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ‘हे तुमचे घर नाही, हे माझे चेंबर आहे, येथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा‘, असे सांगितले. भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष यांनी वरील वक्तत्व केल्याबद्दल अमळनेर शहर व तालुका शिवसेनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भातील पत्र अमळनेर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या पत्रकावर तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, , उपशहरप्रमुख जीवन पवार, शिवसेना वाहतुक सेना रमेश पाटील, विभागप्रमुख विजय पाटील, शाखाप्रमुख मनोज देवरे, रा.वि.काँ. तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी, कार्याध्यक्ष सनी गायकवाड, रा.यु.काँ. जिल्हा उपाध्यक्ष गोविंदा आवीरकर, जिल्हा सरचिटणीस निनाद सिसोदे, रा.वि.काँ. शहर उपाध्यक्ष अनिरुध्द सिसोदे, गणप्रमुख मांडळ उमेश पाटील, रा.यु.काँ. शहराध्यक्ष बाळू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







