दोंडाईचा (संतोष कोळी) – येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसाद देशमुख यांच्या वादिवसाच्या निमित्ताने
चिमठाणे गावात वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका सचिव धनंजय यशवंत धनगर तसेच सहकारी मित्र. ललित गिरासे. बंटी अहिरे. नितीन धनगर. जयेश महाजन आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे सूचक मार्गदर्शक रवींद्र हिम्मत पाटील.तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिंदखेडा तालुका हे होते. या उपक्रमातंर्गत पाच वृक्षांची लागवड करण्यात येवून, गावातील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी पाटी, दोन खडू, पेन्सिल बॉक्स (पेन्सिल शार्पनर खोडरबर वही उजळणी पुस्तिका) देण्यात आले.







