धुळे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती व वलवाडी येथील एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ईको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दि, २३ जुलै जागतिक वन संवर्धन दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला,
वलवाडी येथील एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर वर्षी निसर्ग-मित्र समिती व ईको क्लब तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येतो,या वर्षी ही १०० वृक्षाची लागवड करून संवर्धन करण्याची शपथ घेऊन वृक्षांरोपण करण्यात आले.
याप्रसंगी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक तथा राज्य पर्यावरण ग्राम समृध्दी योजनेचे मा,सदस्य प्रेमकुमार अहिरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक एस, बी, पाटील,पर्यवेक्षक एस बी पाटील, प्रायमरीचे मुख्याध्यापक एम वाय मोरे ,माजी मुख्याध्यापक पी व्ही ठाकरे, पर्यवेक्षक एस पी पाटील,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी हरीत सेनेचे पर्यावरण विभागाचे शिक्षक एम, टी, पाटील,प्रा,भदाणे,जी व्हा फुलपगारे,एस जी मोरे देवरे-सर सर, निसर्ग अहिरे आदीं उपस्थित होते, यावेळी सोशल डिस्टींगचे पालन करण्यात आले.









