नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचं समोर आल्यानंतर आता ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागपूरमधील कन्हान-कांदरी येथे असलेल्या जवाहरलाल नेहरू रूग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन अभावी जवाहरलाल नेहरू रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखं पसरलं आणि एकच खळबळ उडाली. यावेळी रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड सुद्धा केल्याचं समोर आलं आहे.
नागपूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा पbulरिषदेने नागपूरातील वेस्टर्न कोल्ड फील्डच्या जवाहरलाल नेहरू रुग्णालयाचं कोविड रुग्णालयात रुपांतर केलं होतं. या रुग्णालयात 29 रुग्णांवर उपचार सुरू होते.






