नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्त दान शिबिराचे आयोजन

नवी मुंबई(प्रतिनिधी) : राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी च्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात आनेक बाटल्या रक्त संकलित झाले आहे.

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपध्यक्ष महेश भंणगे, उपाध्यक्ष तुकाराम कदम, नवी मुंबई माजी नगरसेवक एकनाथ तांडेल , नवी मुंबई सचिव विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे , वार्ड अध्यक्ष सोमनाथ बारवे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष उपस्थिती दर्शवली.

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी मधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये रांगा लागल्या होत्या.

या कार्यक्रम प्रसंगी मा. नगरसेवक- आमित पाटील, एकनाथ तांडेल,उपाध्यक्ष- महेश भनगे,नवनाथ चव्हाण , गुरबींदर सिंग, ईफारन पटेल सरचिटणीस- तुकाराम कदम सेवदलचे अध्यक्ष – जी.एस.राजगोपाल, माथनेटी सेलचे अध्यक्ष – अन्वर हवलदार,ओबीसी सेलचे अध्यक्ष- दिगंबर राउत, महिला अध्याक्षा- उज्वला साळवे, सचिव – फजिल शेख, विरेंद्र म्हात्रे, वार्ड अध्यक्ष – सोमनाथ बारवे,कमलाकर चौगुले,वंसत चिलविरे, डॉ. डि.वाय.पाटील दवाखान्याचे डॉक्टर व नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here